इतर ग्रहांचा सुगम प्रवास ( Etar Grahancha Sugam Pravas )
Description
असे म्हटले जाते की, सिद्ध योगी मृत्यूच्या वेळेस आपल्या शरीराचा त्याग करून, मनाच्या गतीने, भौतिक ब्रह्मांडाच्या सीमारेषेपलीकडे असलेल्या प्रतिपदार्थमय ग्रहलोकांपर्यंत प्रवास करीत जाऊ शकतो. सूक्ष्म, आध्यात्मिक शक्तीद्वारे, तुम्ही इतर ग्रहांचा प्रवास करू शकता आणि भगवंतांच्या सृष्टीची आश्चर्ये पाहू शकता अथवा भौतिक जगापलीकडे जाऊन आपल्या शाश्वत घरात कृष्णांबरोबर राहण्याचा मार्ग निवडू शकता. ‘इतर ग्रहांचा सुगम प्रवास’ या पुस्तकात विशाल ब्रह्मांड व आध्यात्मिक जग यांचे विहंगमावलोकन विशद केले आहे, जेणेकरून तुम्ही चलाखपणे तुमच्या प्रवासाचे ठिकाण निवडू शकता.