language pack

पूर्ण प्रश्‍न पूर्ण उत्तर ( Purna Prashna Purna Uttar )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

श्रील प्रभुपादांबरोबर झालेल्या अनेक भेटींमुळे ‘पीस कॉप्‍‍‍‍‍‍‍‍‍र्स’ च्या भारतातील एका कार्यकर्त्याचे जीवन बदलून जाते. सन १९७२ साली, ‘पीस कॉप्‍‍‍‍‍‍‍‍‍‍र्स’ मधील एक विज्ञान शिक्षक, बॉब कोहेन याने आध्यात्मिक ज्ञानाचा एक शोध सुरू केला आणि त्यामुळे तो भारतात येऊन पोहोचला. त्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या श्रील प्रभुपादांबरोबर झालेल्या या भेटींचा प्रतिलेख येथे प्रस्तुत करीत आहोत. या भेटी भारतातील मायापुर या पवित्र स्थळी, जे श्री कृष्णचैतन्य महाप्रभुंचे जन्मस्थान आहे, झाल्या होत्या.