language pack

कृष्णभावना सर्वोत्तम योग ( Krishna Bhavana Sarvottam Yog )

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

जरी जगामध्ये अनेक प्रकारच्या योगपद्धती आहेत, तरी वैदिक साहित्य हे स्पष्ट करते की, जर तुम्ही कोणतीही पद्धत स्वीकारलीत, तरी देखील जर तुमच्याजव‍ळ भक्ती असेल, तरच तुम्हाला यश मिळेल. भक्तियोग आहे तरी काय आणि भक्तियोगास आपण कशाप्रकारे आपल्या जीवनात किंवा आपल्या सध्याच्या योगपद्धतीमध्ये जोडू शकतो? कोणत्याही योगपद्धतीत किंवा धर्मपद्धतीत केंद्रवर्ती भूमिका भक्तीचीच असल्यामुळे भक्तीलाच सर्वोत्तम योगपद्धती म्हटले जाते. भगवद्‍गीतेत भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय मित्र अर्जुनास भक्तियोगाची शिकवण देतात आणि येथे श्रील प्रभुपाद त्याच विचारधारेस या परिचयात्मक पुस्तकात आणखी स्पष्ट करून सांगतात.