कर्मयोग ( Karma Yoga )
Description
भगवान श्रीकृष्ण आपल्याला संदेश देत आहेत : आपण शरीर नसून आध्यात्मिक जीवात्मे आहोत. शुद्ध आध्यात्मिक विचारधारेनुसार जात, पंथ, वर्ण किंवा लिंग यांच्या उपाधी अस्तित्वात नसतात. या पंथनिरपेक्ष स्तरावरून संपूर्ण जग खरी एकता आणि शांती प्राप्त करू शकते. ही विचारप्रणाली स्वीकारल्याशिवाय आपल्याला हवा असलेला आनंद वैयक्तिकपणे किंवा सामूहिकपणे आपल्या आवाक्याबाहेरच राहील. दुसऱ्या महायुद्धाच्या काही काळानंतर लिहिले गेलेले हे पुस्तक दाखवून देते की संपूर्ण समाज भगवद्केन्द्रित साम्यवादाच्या स्थितीमध्ये शांततेने कसा नांदू शकतो.